दीप अमावस्या

                            दीप अमावस्या

भारतीय संस्कृती मध्ये अनेक दिन विशेष साजरे केले जातात.त्या पैकी आषाढ अमावास्या म्हणजे दीप अमावस्या आहे.अंधारातून तेजाकडे नेणाऱ्या दिव्याची पूजा करण्याचा हा दिवस !
आषाढात मनाला आलेली मरगळ झटकून ऋतुराज श्रावणाचे स्वागत करण्यासाठी आपण जणू दिवे लख्ख करतो,श्रावणातील सणवारासाठी आपण सज्ज होतो…
या दिवशी देवघरा समोर छान रांगोळी काढून घरातील समई,निरांजनआणि अन्य दिवे स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जाते.मंद तेवणाऱ्या ज्योती जणू आयुष्यात प्रकाशवाटा दाखवत असतात.
या दिवशी कणकेचे पुरण घातलेले दिवे,दिंडे यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गासमोर रांगोळी काढली, दिव्यांची आरास केली . पॅनल बोर्ड सजावट असे उपक्रम केले.

Scroll to Top