म .ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात मातृदिनानिमित्त *नो फायर कुकिंग* पाककृती स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या अनेक माता-पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
माता-पालकांनी कोणत्याही प्रकारच्या अग्नीचा वापर न करता विविध रुचकर, पौष्टिक व आकर्षक पाककृती तयार केल्या. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच, काकडीचा चाट, दही सँडविच, पान मोदक, काकडीचा हंस तसेच अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांचा समावेश होता. 🥗
सर्व पदार्थ चविष्ट, स्वादिष्ट आणि आकर्षक होते. विशेष म्हणजे या सर्व पाककृती तयार करताना अग्नीचा कुठेही वापर करण्यात आला नाही. माता-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, सर्जनशीलता आणि पाककलेतील कौशल्य यामुळे हा उपक्रम अत्यंत आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. 🌷
मातांच्या सहभागामुळे मातृदिनाचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला! 💐


