शिक्षक दिन : माध्यमिक विभाग – मराठी माध्यम

 

दिनांक ८ सप्टेंबर रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसीय शिक्षकाची भूमिका उत्साहाने पार पाडली. यश कुलकर्णी याने मुख्याध्यापकाची, तर परी कुलकर्णी व पल्लवी वनवे यांनी पर्यवेक्षिकेची भूमिका बजावली.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षक बनून पूर्वप्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकविले.इयत्ता सातवीतील शरण्या म्हस्के हिने मुख्याध्यापकाची भूमिका अतिशय आत्मविश्वासाने पार पाडली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार करून शिक्षकांचा सत्कार केला व कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षकांची जबाबदारी व कार्य समजून घेण्याची अनोखी संधी या उपक्रमातून मिळाली.

हसत-खेळत व खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षक दिनाचा हा उपक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.

Scroll to Top