म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय ,नवीन पनवेल
(माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)
विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्याध्यापिका सौ .सोमण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच परिपाठाच्या वेळी कौशल उतेकर ८वी भास्कराचार्य, क्षितिज बोरसे ९वी कणाद आदित्य खिळदकर ७वी समुद्रगुप्त, या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर उत्स्फूर्तपणे भाषण केले.
प्रत्येक
विद्यार्थी वर्गात जाताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करून, वर्गात गेले. अशाप्रकारे आज शिवजयंतीचे सादरीकरण करण्यात आले.






