म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.
बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यालयात, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याकरिता “वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल व त्याचे नियोजन” तसेच “वैयक्तिक स्वच्छता” या विषयावर व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे आयोजन Heed India या सेवाभावी संस्थेमार्फत करण्यात आले होते. मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून
डॉ. सुनिता गोगटे (स्त्रीरोगतज्ञ) , डॉ.अमेय प्रभु , डॉ.सुशीला नाईक, वैद्यकीय समाजसेविका अंजू जिंदे , परिचारिका , सौ. अरुणा व सौ. सुवर्णा तसेच संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती इनामदार उपस्थित होत्या.








