वार्षिक स्नेहसंमेलन
शैक्षणिक वर्ष : २०२५–२६
दिनांक : २८/११/२०२५
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचा २७ वा वार्षिक स्नेहसंमेलन ‘अवघा रंग एक झाला’ या विषयावर उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापकांच्या प्रतिमा, नटराज व विठ्ठल-रखुमाई मूर्ती पूजनाने प्रमुख पाहुण्या सौ. साक्षी दळवी यांच्या हस्ते झाली. व्यासपीठावर देवरे मॅडम व साळुंखे मॅडम उपस्थित होत्या. साक्षी दळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व स्पर्धांचे बक्षीस वितरण केले. विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड, नृत्य अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. शेवटी देवरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
















