म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय ,नवीन पनवेल
गुरुवार दि.१९ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या आपल्या मातृसंस्थेचा १६६ वा वर्धापनदिना चा सोहळा विद्यालयातील कै. प्रभाकर पटवर्धन सभागृहात सुप्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९ वी चे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद ,कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.कमला एकनाथ देशेकर आणि जागृती एकनाथ देशेकर ( माजी विद्यार्थिनी ) उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापकांच्या शुभहस्ते संस्थेच्या श्रद्धेय संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करून देवी शारदेच्या स्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संस्थेची १६६ वर्षाची उज्वल परंपरा दर्शवणारी डॉक्युमेंट्री फिल्म दाखवण्यात आली.
माध्यमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. रचना पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या प्रदीर्घ उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा , शिक्षणक्षेत्रातील प्रेरणादायी वाटचालीचा, आलेख सादर केला.”या महान संस्थेचे आपण पाईक आहोत याचा रास्त अभिमान बाळगून लीन भावनेने या अखंड ज्ञानदानाच्या कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचा संकल्प या शुभदिनी करूया.” असे आवाहन त्यांनी केले . प्रमुख पाहुण्या कमला देशेकर यांनी आपल्या भाषणात वर्धापन दिनाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या तसेच संस्थेच्या कार्याला शतशः वंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षिका प्रिती धोपाटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता म. ए. सो.च्या ध्येय गीताने झाली🙏













