भोंडला – माध्यमिक विभाग – मराठी माध्यम

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील भोंडला हा महिलांचा व मुलींचा एक पारंपरिक लोकउत्सव आहे. नवरात्रीच्या काळात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, सामाजिक एकोपा वाढवणे आणि लोकपरंपरांचे जतन करणे हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख व्हावी आणि पारंपरिक सणांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विद्यालयात भोंडलाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हत्तीच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.पाटील मॅडम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून पारंपरिक भोंडल्याची गाणी गायली. या गीतांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले.

इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पारंपरिक गीते, सामूहिक नृत्य आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला. मुख्याध्यापिका मा. पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भोंडल्याची परंपरा, त्यामागील सांस्कृतिक महत्त्व आणि लोककला जतन करण्याची गरज यांविषयी मार्गदर्शन केले.या मागचा मुख्य उद्देश

१. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणे.

२. पारंपरिक लोकगीते व लोककला यांचे जतन करणे.

३. विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सहकार्य आणि आनंदाची भावना वाढवणे.

४. पारंपरिक सण व उत्सवांचे महत्त्व समजावून सांगणे.

५. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे. हा होता.

भोंडला आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची माहिती मिळाली. सामूहिक सहभागातून आनंद, एकोपा आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी आदर निर्माण होतो आणि पारंपरिक लोककला जतन करण्याची प्रेरणा मिळते.

Scroll to Top