२७ वा शालेय वर्धापन दिन [ प्राथमिक मराठी ]

२७ वा शालेय वर्धापन दिन

विद्यालयाच्या सभागृहात सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ वा शालेय वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या इतिहासाची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका मा. निशा देवरे मॅडम यांच्या हस्ते देवी शारदा व संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे व श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, तसेच त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कांडपिळे मॅडम यांनी संस्थेच्या ऐतिहासिक वाटचालीचे सुंदर कथन केले. त्यानंतर संस्थेची प्रगती दर्शवणारा एक रंजक माहितीपट दाखवण्यात आला. अशा प्रकारे अत्यंत आनंदमय वातावरणात हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला .

Scroll to Top