जागतिक योग दिन’ [ प्राथमिक मराठी ]

जागतिक योग दिन’

​म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या प्राथमिक विभागात (इयत्ता १ ली ते ४ थी)  ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची आवड व एकाग्रता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षक सभागृहात उपस्थित होते. मुख्याध्यापिका मा. निशा देवरे मॅडम यांनी ‘आंम्बिका योग कुटीर ‘ संस्थेच्या प्रशिक्षकांचे स्वागत ‘तुळशीचे रोप’ देऊन केले व प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, प्राणायाम व ध्यानधारणा या योगासनांचा आनंदात सराव केला. प्रशिक्षकांनी प्रत्येक आसनाचे महत्त्व व आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत पटवून दिले. विद्यार्थ्यांचा उत्साह व शिस्त यांमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, सर्वांनी निरोगी जीवनशैलीसाठी दैनंदिन योग करण्याचा संकल्प केला.

Scroll to Top