बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. भावाने बहिणीचे रक्षण करावे या मागचा हेतू आहे. दि.२७/०८/२०२3 रोजी आपल्या पूर्व प्राथमिक विभागात रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रंगीत कपडे घालून येण्यास सांगितले. मुले व मुली छान कपडे घालून आले होते. विद्यार्थ्यांना शाळेतून राख्या देण्यात आल्या. मुलींनी राखी आणल्या होत्या, मुलांनी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. रक्षाबंधन हा सण आपापल्या वर्गात साजरा करण्यात आला. सर्व
वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गात या सणाची माहिती सांगितली. प्रत्येक मुलांना मुलींनी कुंकू लावून वर्ग शिक्षिकेच्या मार्गदर्शना प्रमाणे राखी बांधली. मुलांनी राखी बांधून घेतली आणि बहिणीसाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या. सर्व विद्यार्थी या दिवशी आनंदात होते. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. अशा रीतीने रक्षाबंधन हा सण अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला.
https://photos.app.goo.gl/zfcXwhyYukacNHcZA
https://photos.app.goo.gl/rk6UiTAYRUtu7DHa8