सामाजिक भोंडला

शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी विद्यालयात शारदोत्सव निमित्त सामाजिक भोंडलाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सर्व पालक प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले. यश व समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या तसेच हत्ती नक्षत्राचे स्वागत करण्यासाठी हत्तीचे पूजन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण  व तसेच सर्व पालक प्रतिनिधींच्या  हस्ते करण्यात आले. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत वर्गनिहाय देवी शारदेचे पूजन करण्यात आले. सर्व महिला पालक प्रतिनिधींनी व विद्यार्थी यांनी भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरून मनमुराद आनंद घेत गरबा खेळण्यात सहभागी झाले. या दिवसाचे औचित्य साधून महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धा तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनवणे यांची स्पर्धा घेण्यात आली.

https://photos.app.goo.gl/unYNrusT8p17ASNf7

https://photos.app.goo.gl/47R2A2Wzc3Jyon1K7

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’