प्रवेशोत्सव २०२४-२०२५

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग – मराठी माध्यम         शनिवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले, स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात औक्षण व स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण मॅडम यांनी केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्गात वर्ग शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून ग्रीटिंग कार्ड भेट देऊन त्यांचे स्वागत केले. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

https://photos.app.goo.gl/ZUS58SocB5D6WDcT6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’