उद्यमलक्ष्मी २०२२-२३

                                                                                  उद्यमलक्ष्मी – २०२२-२३ 
नवीन पनवेल येथील म. ए. सो., पुणे संचालित आ. वा. बा. फडके विद्यालयातर्फे परिसरातील लघुउद्योगांना बळ देण्यासाठी तसेच विद्यालयातील होतकरू उद्योजक पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्यमलक्ष्मी’ उपक्रमाचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघटक मा. श्री.दादा जोशी, ब्राह्मण सभा, नवीन पनवेलच्या अध्यक्षा मा. दिपाली जोशी, ज्येष्ठ उद्योजिका व प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री प्रज्ञा पेंडसे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. .
उपस्थितांशी संवाद साधताना मा. दिपाली जोशी यांनी ‘व्यावसायिक प्रगतीसाठी चिकाटी, परिश्रम, कल्पकता यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. उद्योग विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल फडके विद्यालयाचे कौतुक केले व अश्या मेळाव्यांतून लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळते’ असे प्रतिपादन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या खरेदी मेळाव्यामध्ये साड्या, कुर्तीज, पर्सेस, ज्वेलरी, आयुर्वेदिक उत्पादने, उटणे, पणत्या, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ नॅपकिन पासून बनविलेले बुके इ. विशेष वस्तु सर्व सामान्यांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले. एकूण ३५  स्टाॅल्स लावण्यात आले होते.
काही मोजकी क्षणचित्रे पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

 

 

Leave a Comment