बुधवार दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयात पहिली ते दहावीच्या महिला पालकांसाठी स्त्री पुरुष समानता व पालकत्व या विषयावर मयुरी धुमाळ हिचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे *मयुरी धुमाळ* ही विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून सध्या स्त्रीवादी लेखिका, सामाजिक कार्यकर्ती म्हणून सर्वश्रुत आहे. उपस्थित महिला व विद्यार्थिनींशी संवाद साधताना महिला पालकांनी मुलगा व मुलगी वाढवताना लिंगभेद न करण्याचे आवाहन तिने केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी स्नेहभेट व भेटकार्ड देऊन मयुरीचे स्वागत केले.
महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालकांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती ची स्पर्धाही घेण्यात आली . महिला पालकांनी विविध टिकाऊ वस्तू विद्यालयात आणून दिल्या होत्या. या वस्तूंचे परीक्षण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका श्रीमती सेजल शेठ यांनी केले. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या महिलांना प्रभारी मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.