१मे महाराष्ट्र दिन विद्यालयात संपन्न

आज १मे महाराष्ट्र दिनाच्या प्रात:समयी उगवत्या सूर्याच्या साक्षीने फडके विद्यालयाच्या प्रांगणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजचे मंगलमय ध्वजवंदन संपन्न झाले. सर्व विभागातील मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत,महाराष्ट्र गीत, म्हणण्यात आले.
विद्यालयाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा समारंभ सम्पन्न झाला.

https://photos.app.goo.gl/qujRA3XsMVw9YbLR9

Leave a Comment