आंतरराष्ट्रीय योग दिन

म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल मराठी माध्यम शुक्रवार दिनांक २१जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन योग केंद्र पनवेल येथील योगाचार्य प्रज्ञा सहस्त्रबुद्धे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण मॅडम यांनी केले. याप्रसंगी प्रज्ञा सहस्त्रबुद्धे. मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून मंत्रोच्चाराने इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली. इयत्ता आठवी भास्कराचार्य वर्गातील कु. यश मंदार कुलकर्णी यांनी योग दिनाची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका विजया जाधव यांनी केले.

प्राथमिक विभाग

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन व शाळा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
दुधात साखर पडावी असे दोन योग जुळून आले, शाळा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय योग दिन. योग दिनानिमित्त अंबिका कुटीर योग ठाणे शाखा पनवेल त र्फे आलेले आदरणीय प्रशिक्षक वर्ग तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय निशा देवरे यांच्या हस्ते देवी सरस्वती व संस्थापकांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका कांडपिळे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी केले .
सर्व प्रशिक्षकांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनीही या प्रात्यक्षिकांमध्ये आनंदाने सहभाग घेतला . यात ताडासन भद्रासन त्रिकोणासन वज्रासन भुजंगासन पर्वतासन असे विविध आसने घेण्यात आली. शाळा उभारणीपासून असलेले जेष्ठ शिक्षिका कांडपिळे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी स्वप्निल शिंदे यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळा वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे दोन्ही कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाले.

https://photos.app.goo.gl/gHxnHzRw8VPJziBu8

 

Leave a Comment