१०वी गुणगौरव सोहळा

*शाळा हे संस्कारांचे केंद्र*
शुक्रवार, दि.२८ जून २०२४ रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले,” शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादामुळेच यश मिळते. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये जपावी. विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांच्या प्रयत्नांचे यश असते.” पुढे त्यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव व स्वतःच्या शालेय जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तर्फे समुपदेशन क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. डॉ राजीव हजरनीस यांनी शाळांसाठी गुणगौरव सोहळ्याचे महत्त्व स्पष्ट केले. उद्योजकतेचे महत्त्व स्पष्ट करताना पुढे ते म्हणाले,” प्रत्येकामध्ये उद्योजकीय, यशसिद्धीची प्रेरणा असावी.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मा. डॉ. राजीव हजरनीस यांनी मा. रमेश चव्हाण यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी
याकार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. डॉ. राजीव हजरनीस, म ए सो शिक्षण प्रबोधिनी चे सहायक संचालक मा. केदार तापीकर, भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष मा. सुबोध भिडे, माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे, प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी उपस्थित होत्या.
आपल्या प्रास्ताविकात मा. समिता सोमण यांनी शाळेच्या १००% निकालाबद्दल विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या,” विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अथक परिश्रमाचे चीज झाले.”
प्रातिनिधिक स्वरूपात देवयानी शिंदे, श्रावणी गुंड, अपूर्वा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांमधून सौ. स्नेहल भूषण कुलकर्णी यांनी शाळेबद्दलचा अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांबाबत मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेले आजी माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता म ए सो गीताने झाली.
सहाय्यक शिक्षिका स्वाती बापट यांनी सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/SyfoG97HSLbYyNhy8

Leave a Comment