नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे व शेतकऱ्यांचा खरा मित्र’ असलेल्या सापांची भीती दूर व्हावी विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू सणांची ओळख व माहिती मिळावी ह्या हेतूने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपंचमी प्रकल्प मांडण्यात आला. मा मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी सापाच्या वारुळाचे पूजन केले.लाह्यांचे नैवेद्य दाखवण्यात आला. प्रकल्पामध्ये गारुडी ,झोका खेळणाऱ्या मुली, वारूळ, वारुळाची पूजा करताना स्त्रिया,यांचे कटआउटस् विद्यार्थ्यांना दाखवून माहिती सांगण्यात आली तसेच प्रकल्प पाहण्यासाठी पालकांना बोलवण्यात आले होते पालकांनीही प्रकल्प पाहून अभिप्राय दिला व उपक्रमाचे कौतुक केले.