मराठी भाषा गौरव दिन
सोमवार दिनांक २७/०२/२०२३ रोजी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर दिवशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ देवरे मॅडम व पारंपारिक पोशाखात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. मधुरा कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सहा. शिक्षिका सौ सावंत …