अध्यापक प्रबोधनी अंतर्गत व्याख्यान – उपक्रम क्र.१

माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील सर्व शिक्षकंसाठी अध्यापक प्रबोधनी अंतर्गत शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता पहिल्या मजल्यावरील ८ वी भास्कराचार्य वर्गात, आपल्या विद्यालयातील नवनिर्वाचित समुपदेशक सौ. शिंदे यांच्या मार्फत शिक्षकांसाठी ” मानसिक आरोग्य व मनाचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा विद्यार्थ्यांवर खूप खोलवर परिणाम होतो.
सुप्त मनावर परिणाम करणाऱ्या बाबींचे स्पष्टिकरण दिले व त्यावर विशेष लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले.
मानसिक अनारोग्यामुळे शरीरावर व वर्तनात कोणते बदल होतात ते स्पष्ट केले. मनाचे व्यवस्थापन म्हणजे काय हे सांगून मनाचं आरोग्य जपण्यासाठी चे उपाय सूचवले.‌ स्व संवाद, दैनंदिनी लेखन, श्वासाचे व्यायाम, छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वतः ला जपताना घ्यावयाची काळजी अनेक उदाहरणामधून स्पष्ट केले. स्वप्रतिमा उंचावण्यासाठी स्वतः वर काम करण्याचे महत्त्व सांगितले. स्वनियंत्रणाचे उपाय सांगून व्याख्यानाची सांगता झाली.

Scroll to Top