योग दिवस
२० जून २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागात लहान मुलांमध्ये योगाचे महत्व समजावे, शरीर आणि मन तंदुरुस्त रहावे या उद्देशाने विविध योगासने घेण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांना सोप्या आणि मजेशीर पद्धतीने ताडासन, प्राणायाम ,वज्रासन यांसारखे मूलभूत योगासने करून घेतली लहानग्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी उत्स्फूर्तपणे सर्व योगासने केली.
योगामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक चपळता मानसिक एकाग्रता आणि सकारात्मकता निर्माण झाल्याचे दिसून आले तसेच शिक्षकांनी मुलांना नियमित योग करण्याचे फायदे सांगितले व शुभेच्छा दिल्या.






