आषाढी एकादशी
विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी याकरिता आषाढी एकादशीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी काळुंद्रे गावातील देवालयात स्वच्छता मोहीम राबवली व वृक्षारोपण केले. देवरे मॅडम यांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले. अभंगगायन, हरिनाम आणि नदीभेटीद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि संस्कृतीचे महत्त्व समजले.
इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सहभाग घेत “दिंडी”मध्ये टाळ-मृदुंगासह भक्तीमय वातावरण निर्माण केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख व सामाजिक जाणीव निर्माण झाली.











