अध्यापक प्रबोधिनी उपक्रम: माध्यमिक विभाग – मराठी माध्यम

 

*अध्यापक प्रबोधिनी उपक्रम*

म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी मंगळवार, दिनांक ३० जून २०२६ रोजी अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत इ.६ वी पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथे झालेल्या राज्य स्तरीय प्रशिक्षण वर्गात सुलभक म्हणून सहभागी झालेल्या विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रीती भालचंद्र धोपाटे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० , राज्य शैक्षणिक आराखडा २०२५ तसेच इ. ६ वी च्या नवीन अभ्यासक्रमातील महत्वपूर्ण घटक स्पष्ट केले.

इ.६ वी पासून सुरू झालेले व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण व शारीरिक शिक्षणात सहभागी निरामयता याबाबत मार्गदर्शन केले. HPC बाबत माहिती सांगितली. आंतर समवाय पद्धतीचे फायदे स्पष्ट केले. भारतीय ज्ञान प्रणाली बाबत माहिती दिली.

“इ.६ वी पासून सुरू झालेल्या कृतियुक्त अध्यापन पद्धतीचा मुलांना खूप फायदा होईल” असे मत विद्यालयाच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका मा.सौ रचना पाटील यांनी या उपक्रमाबाबत व्यक्त केले.

Scroll to Top