नमस्कार
संस्थेच्या वतीने पुढील काळात येणारे सण-उत्सव व आपल्या परंपरा या पर्यावरणपूरक या थीमवर सर्वत्र साजऱ्या व्हाव्यात अशा प्रकारची योजना केली आहे. या माध्यमातूनच आपण *माजी विद्यार्थ्यांपर्यंत* सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळा-महाविद्यालयांशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित व्हावा व ज्यांची अद्याप पर्यंत नोंदणी झाली नसेल, त्यांची नोंदणीही करून घेता यावी, म्हणून आपण अनेक उपक्रम पुढील काळामध्ये आयोजित करणार आहोत. त्यातील *पहिला* उपक्रम हा *पर्यावरणपूरक पंढरीची वारी* असा असेल. या उपक्रमाद्वारे आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करावयाचे आहे की आपण *पंढरीच्या वारीच्या मार्गावर* अथवा *ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी* एक *भारतीय वंशाचे* झाड लावावे व त्याचा फोटो वर दिलेल्या फ्लायर्समध्ये दिलेल्या क्यूआर कोड वरती स्कॅन करून पाठवावा. अशा माजी विद्यार्थ्यांना आपण एक सर्टिफिकेट आणि त्यांना नोंदणीसाठी लिंक पाठविणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत हा फ्लायर पोहोचवण्याची व्यवस्था करावी.
पुढील काळात आपणाला *पर्यावरणपूरक पंढरीची वारी* याचबरोबर *पर्यावरणपूरक रक्षाबंधन, पर्यावरण पूरक गणेशोत्सव व पर्यावरणपूरक दिपावली* हे सण साजरे करताना विविध उपक्रम राबवायचे आहेत. तरी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की, हा फ्लायर जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करावा.
सर्वांना पंढरीच्या वारीच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद.
#माजीविद्यार्थीपर्यावरणदिंडी


