आंतरराष्ट्रीय योग दिन – पूर्व प्राथमिक विभाग
दि. २२ जून २०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सभागृहात योग सत्रात उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांकडून फुलपाखरू आसन, ताडासन, वज्रासन तसेच प्राणायाम यांसारखी मूलभूत योगासने करून घेण्यात आली.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व व फायदे समजावून सांगितले आणि निरोगी व आनंदी जीवनासाठी योग करण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन करण्यात आली. 🧘♀️🌿✨






