पूर्व प्राथमिक विभाग – शाळेचा पहिला दिवस
सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागात नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. सर्व शिक्षक व सेवकांनी वर्गाबाहेरील पॅसेज आकर्षक पद्धतीने सजवले होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. मुलांचे औक्षण करून त्यांचे आनंददायी स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस वंदन करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. अशा मंगलमय वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गाच्या नावासह विद्यार्थ्यांचे छायाचित्रण करून या विशेष दिवसाची आठवण जतन करण्यात आली.







