शाळा वर्धापन दिन : माध्यमिक विभाग ( मराठी माध्यम)

म. ए . सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल
(माध्यमिक.विभाग मराठी माध्यम)
दि.२१ जून १९९९ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,पुणे
संचालीत ,आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल या आपल्या शाला मातेने, २१ जून २०२६ रोजी २८ व्या वर्षात पदार्पण केले. या प्रसंगाचे औचित्य साधून आज विद्यालयात शाळा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रथम संस्थापकांच्या व देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी मुख्याध्यापिका मा.रचना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गानवृंदाने म. ए. सो. गीत व शाला गीत सादर केले ,त्यानंतर प्रभारी मुख्याध्यापिका मा. रचना पाटील यांनी शाळा वर्धापन दिनाच्या व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
तसेच वर्धापन दिनानिमित्त
स्पर्धा विभागातर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली.

Scroll to Top