आंतरराष्ट्रीय योग दिन : माध्यमिक विभाग ( मराठी माध्यम )

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल ( मराठी माध्यम ) .
सोमवार दिनांक २२जून २०२६ रोजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी योगकेंद्र पनवेल ,येथील योग प्रशिक्षक मनीषा बाळ,सारिका शेलार, सुमेधा रिसबूड,आणि स्वाती निगडे योगाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. रचना पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी मनीषा बाळ मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांकडून मंत्रोच्चारासह मार्जरासन, श्वानासन, वज्रासन, पद्मासन, सुलभ पवनमुक्तासन, पूर्व भूजंगासन, अर्धशलभासन, हस्त पादासन आणि सुलभ ताडासन यांची प्रात्यक्षिके करून घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका स्वाती बापट यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका विजया जाधव यांनी केले.

Scroll to Top