म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय ,नवीन पनवेल (माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)
शनिवार दिनांक २१जून २०२५ रोजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी योगकेंद्र पनवेल ,येथील योगाचार्या सौ. संदीपा देशमुख आणि त्यांचे सहकारी स्वाती निगडे व साक्षी मोरे यांनी योगाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी सौ. संदिपा देशमुख यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांकडून मंत्रोच्चारासह सूर्यनमस्कार, योगासने ,प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली.
दुग्धशर्करा योग म्हणजे आज दिनांक २१जून २०२५ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित ,आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल . शाळा मातेचा २६ वा “वर्धापन दिन”.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये “संकल्प सिद्धी” हा अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिनी समाजहितोत्सुक ,देशहितोत्सुक वैयक्तिक, आणि आपल्या शाळा मातेसाठी एक संकल्प घेतलेला आहे व तो लिखित स्वरूपात आपल्या वर्गातील “संकल्प सिद्धी” या पेटीमध्ये ठेवलेला आहे, आपला संकल्प किती प्रमाणात सिद्धीस गेलेला आहे हे शैक्षणिक वर्षा अखेर त्याची पूर्तता तपसली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच योगदिन व वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने “जंक फूड टाळा – आरोग्य सांभाळा “या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यात्या होत्या आर्युविशारद डॉ.वैशाली सावंत – चव्हाण.
व आरोग्य सेवा समिती,पनवेल चे श्री. सुरेश जाधव सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपटे यांनी केले .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण यांनी योग दिनाच्या व शाळा वर्धापन दिनाच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.














