१६ जून २०२५
शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ…
शाळेचा पहिला दिवस…
प्रत्येक लहान मुलांसाठी खूप खास असतो.
हा दिवस म्हणजे त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाची गोड सुरुवात….
नवीन बॅग, नवीन पुस्तके, नवे मित्र, सगळंच नवीन असण्याची एक वेगळीच उत्सुकता…
सोमवार दिनांक १६जून २०२५ रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा खणखणली. मुख्याध्यापिका, नमिता जोशी मॅडम, सर्व शिक्षक व सेविका विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारीला लागले होते. सर्व शिक्षकांनी स्वतःची कलाकृती दाखवून सर्व वर्ग, व वर्गाबाहेरील पॅसेज कोणतेही प्लास्टिकचे कागद न वापरता रंगीबिरंगी कागदांचा वापर करून सजविलेले होते. शाळेच्या मोठ्या शिशु व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशात भेटवस्तू देऊन हसत मुखाने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नंतर सेल्फी पॉईंट म्हणून शिक्षकांनी सजविलेल्या फलकाजवळ सर्व विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले.
अशाप्रकारे शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आनंदाने व उत्साहाने झाली.








