आषाढी एकादशी

म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,न.पनवेल
(माध्यमिक विभाग- मराठी माध्यम)
आषाढी एकादशी उत्साहात संपन्न
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन.
शुक्रवार दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्ती गीते, नृत्य ,अभंग , हरीपाठ सादर केल. टाळ-मृदंगाच्या नादात विठू नामाच्या गजरात ‘ विद्यार्थ्यांनी पालखी समवेत रिंगण तयार केले, व मोठ्या जल्लोषात , टाळमृदुंगाच्या नादात भक्ती गीतांनी संपुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले .
आषाढी एकादशीची माहिती, महिमा सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावा, यासाठी चि.क्षितिज बोरसे ,(इयत्ता ९वीकणाद) कु. शुभ्रा तिळगुळकर ,(इयत्ता ५वी सम्राट अशोक) तसेच शरण्या मस्के (इयत्ता ६वी चाणक्य )यांनी माहिती कथन केली. यामध्ये प्रामुख्याने वारीची परंपरा, संतांचा महिमा, विठूनामाची महती, वारकरी संप्रदाय, त्यांची भक्ती, श्रद्धा, विश्वास इ. चा समावेश होता. यावेळी संपूर्ण वातावरण विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले होते.
प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आपल्या वर्गाच्या कार्यक्रमासमवेत या विठू नामाच्या दिंडीमध्ये सामील झाले होते.
मा. मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी अभंगाचे गायन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १०वी राजा शिवाजी व राणी लक्ष्मीबाई या वर्गांमधील कु. वैष्णवी गोरडे व कु. श्रेया कदम, यांनी केले होते.
याप्रसंगी दै.सकाळ या वृत्तपत्र समूहाने विद्यार्थ्यांची वाचन कला विकसित होण्यासाठी त्यांच्या NIE या अभ्यास पुरवणीचे वाटप केले.

Scroll to Top