आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव
दिनांक १० जुलै २०२५ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात माननीय सोमन मॅडम यांच्या प्रेरणादायी कथाकथनाने झाली. त्यानंतर वेदांगी करंदीकर हिने भावपूर्ण कीर्तन सादर करून वातावरण भक्तिमय केले. यश कुलकर्णी याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले.
या खास दिवसाचे औचित्य साधून “स्वच्छ वर्ग स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले होते. पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाची स्वच्छता राखत सुंदर पद्धतीने पॅनल बोर्ड सजावट केली होती. या स्पर्धेचे परीक्षण सौ. सुषमा ठाकूर यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.









