कालिदास दिन – संस्कृत दिवस ( माध्यमिक विभाग – मराठी माध्यम )

नमस्कार !🙏
दिनांक १५जुलै २०२६ रोजी कालिदास दिन म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा संस्कृत दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
सकाळच्या प्रार्थनेमध्ये कालिदास दिनाचे महत्त्व आणि कालिदासांचे संस्कृत साहित्यातील अनन्य साधारण स्थान याविषयी माहिती सांगण्यात आली. संस्कृत दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांमध्ये माहेश्वर सूत्र , त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना तसेच संस्कृत भाषेचा अमूल्य कोष म्हणजेच अमरकोष यांच्या संबंधित कथा सांगण्यात आल्या. या निमित्ताने शाळेमध्ये संस्कृत श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
५ वी ते ७ वी गटासाठी द्वादश ज्योतिर्लिंगानि हे स्तोत्र तर ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोणतेही श्लोक निवडण्याची मुभा होती. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात विविध स्तोत्र कंठस्थ करुन म्हटली.
कालिदासो जने जने.. कण्ठे कण्ठे संस्कृतम् | म्हणत कालिदासांच्या चरणी वंदन केले आणि संस्कृतदिनाची सांगता करण्यात आली..!

Scroll to Top