गड किल्ले संवर्धन कार्यक्रम ( माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)

*म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,न.पनवेल*

(माध्यमिक विभाग- मराठी माध्यम)

🚩*गड किल्ले संवर्धन कार्यक्रम*

शनिवार दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्त *कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे मा.श्री नितेश देसाई सर व त्यांचे सहाय्यक श्री. गजानन टाकळे सर यांना निमंत्रित केले होते.* कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका रचना पाटील मॅडम यांनी केले व प्रमुख पाहुणे मा. नितेश देसाई व श्री. गजानन टाकळे यांचे स्वागत केले.

इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांचे खेळ घेऊन श्री. टाकळे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. नंतर श्री. देसाई सरांनी विविध स्लाईडच्या आधारे मुलांना जलदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट किल्ल्यांची ओळख करून दिली.गडाचा घेराव, मेट, माची व बालेकिल्ला असे भाग विस्ताराने समजावले. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पोशाखावर चर्चा करून बरेच बारकावे त्यांनी मुलांसमोर मांडले. किल्ले व त्याचे प्रकार, ऐतिहासिक शस्त्रांची माहिती दिली. प्राचीन गड, किल्ले हे आपल्या ऐतिहासिक संस्कृतीचे, अनेक पराक्रमाचे,शौर्याचे साक्षीदार आहेत आणि आपण त्यांचे संवर्धन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सौ. बापट मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.🙏💐

Scroll to Top