राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णयश ! (माध्यमिक विभाग – मराठी माध्यम)

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत आपल्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथील इयत्ता सातवी (समुद्रगुप्त) चा विद्यार्थी शुभम विजयकुमार पवार याने सुवर्णपदक पटकावत विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शुभमचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

शुभमला राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! तोही यशस्वी होऊन विद्यालयाचे नाव देशभर उज्ज्वल करेल, असा आम्हाला विश्वास आहे. 💐🥇

Scroll to Top