गोपाळकाला

गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा….

दि.१४ऑगस्ट २०२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागात गोपाळकाला हा उपक्रम साजरा करण्यात आला.
शाळेच्या सभागृहात हंडी बांधण्यात आली. दोरीला काकडी व केळी , फुलांच्या माळा लावून दोरी सजवण्यात आली.
मा. मुख्याध्यापिकांनी दहीहंडीचे पूजन केले. सहा. शिक्षिका जान्हवी मॅडम यांनी गोपाळकाल्याची गोष्ट सांगितली.
सर्व बाळगोपाळानी राधा- कृष्णाच्या पोशाखात येऊन दहीहंडी फोडली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गाण्यावर फेर धरला.

Scroll to Top