भोंडला [ प्राथमिक मराठी ]

भोंडला

बुधवार दिनांक: २४-९-२०२५ रोजी विद्यालयात  महाराष्ट्र संस्कृती आणि नवरात्री परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका निशा देवरे मॅडम यांच्या हस्ते हत्तीच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात भोंडल्याचे सांस्कृतिक आणि संस्कारात्मक महत्त्व स्पष्ट केले. कांडपिळे  मॅडम यांनी सूत्रसंचालन करत भोंडल्याचा इतिहास व गाण्यांची माहिती दिली. त्यानंतर मागील शालेय स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचे  बक्षीस वितरण पार पडले. कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला तो भोंडला खेळ, ज्यात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी  हत्तीच्या मूर्तीभोवती पारंपरिक गाण्यांवर आनंदाने फेर धरत नृत्य केले. दुपारच्या सत्रात खास महिला पालक वर्गासाठी भोंडला आयोजित करण्यात आला, ज्यात विजया कुलकर्णी मॅडम यांनी “माझे आरोग्य माझ्या हाती” या विषयावर समुपदेशन केले. यानंतर महिला पालकांनी उत्साहाने भोंडल्याच्या गाण्यांवर गायन व नृत्य करत सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव घेतला. मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली.

 

Scroll to Top