रक्षाबंधन
रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा…..
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण.
भारतीय संस्कृती व बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून, पूर्व प्राथमिक विभागात दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन हा उपक्रम शाळेच्या सभागृहात साजरा करण्यात आला .
सर्व विद्यार्थी रंगीत पोशाखात उपस्थित होते. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने औक्षण करून राखी बांधली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना भेटवस्तू दिली.
अशाप्रकारे एकमेकांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत मित्रत्व, स्नेह, सामाजिक ऐक्याची भावना जागृत केली. हा उपक्रम मा. मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.




