शुभम करोति कल्याणम
आरोग्यम् धनसंपदा ।
शत्रु बुद्धी विनाशाय
दीप ज्योती नमोस्तुते ||
दीप अमावस्या चे महत्व मुलांना कळावे, या हेतूने पूर्व प्राथमिक विभागात दि.२४/७/२५ रोजी दीप अमावस्या प्रकल्प साजरा करण्यात आला.
आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीच्या प्रकाशाने सारे जग झगमगून टाकता येते, तरीही दिवा लावून नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे.
सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर व सुबक सजवलेले दिवे आणले होते. त्या दिव्यांची मांडणी सर्व शिक्षिका व सेविकांनी करून, सर्व दिवे प्रज्वलित केले. नंतर मा. मुख्याध्यापिकांनी सर्व दिव्यांचे पूजन केले व विद्यार्थ्यांकडून श्लोक म्हणून घेतला . सहा. शिक्षिका यांनी दिव्यांची गोष्ट सांगितली तसेच पारंपारिक दिव्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.
अशा रीतीने ज्ञानरूपी दिवा लावून अज्ञानरूपी अधंकार नाहीसा होण्यासाठी विद्यार्थी , शिक्षक ,सेविका यांनी दिव्याला प्रार्थना केली.





