विद्यालयाच्या २५ वर्षांच्या परंपरेनुसार इयत्ता १० वीत विद्यालयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. तिच परंपरा जपत यावर्षी हा सन्मान इंग्रजी माध्यमात सर्वप्रथम आलेल्या अक्षता पराडकर चे पालक श्री. विश्वास व सौ. अनुश्री पराडकर यांना प्राप्त झाला.
ध्वजारोहणानंतर ध्वजगीत, राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री. विश्वास पराडकर यांनी विद्यालयाचे आभार मानले व विद्यालयातील नाविन्यपूर्ण व संस्कारशील उपक्रमांचे कौतुक केले.
प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनी मा. देवदत्त भिशीकर व मा.सुधीर गाडे यांनी आपल्या प्रेरक संवादाने विद्यार्थ्यांना व उपस्थितांना देशभक्ती
चा संदेश दिला.
या मंगलदिनी विद्यालयातील अद्यावत व नवीन संगणक कक्षाचे उद्घाटन ‘ फ्लोलाईन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर गिरीश समुद्र यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी म. ए. सो. कार्यकारी अध्यक्ष- मा. सचिन अंबर्डेकर, शाळा समिती अध्यक्ष- मा. देवदत्त भिशीकर, महामात्र- मा. सुधीर गाडे तसेच शाला समिती सदस्य- मा.रविकांत झिरमिटे उपस्थित होते.
माननीय मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व संगणक कक्षाचे अनावरण व उद्घाटन श्री. गिरीश समुद्र यांच्या हस्ते करण्यात आले.
गिरीश समुद्र सरांनी विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम ,आधुनिक व ज्ञान समृद्ध करण्याच्या प्रवासात ,फडके विद्यालयात नव्याने साकारलेल्या सुसज्ज संगणक कक्षासाठी नवीन संगणक खरेदीसाठी एकूण १३,५०,००० सी एस आर निधी प्रदान केला. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने शाळेच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
मा. रविकांत झिरमिटे, मा.देवदत्त भिशीकर यांनी डॉक्टर गिरीश समुद्र यांच्या या दातृत्वाविषयी ऋणनिर्देश केले.
आजच्या या सुवर्णक्षणी शिक्षकांसाठी नव्याने बांधलेल्या शिक्षक कक्षांचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना माध्यमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका सौ.समिता सोमण यांनी केली ,मान्यवरांचा परिचय इंग्रजी माध्यम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शितल साळुंखे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा महाजन यांनी मानले. याप्रसंगी प्राथमिक विभाग मराठी माध्यम मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे व पूर्व प्राथमिक इंग्रजी व मराठी माध्यम विभाग मुख्याध्यापिका श्रीम.नमिता जोशी उपस्थित होत्या.
सहाय्यक शिक्षिका सौ.वैभवी मराळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.




















