पालक शाळा उपक्रम

पालकांना त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासात सहकार्य करण्यासाठी शिक्षण प्रणालीची माहिती देणे, संवाद वाढवणे आणि शाळा पालकयांच्यात सशक्त नाते निर्माण करणे या उद्देशाने दि.१९/७/२५ रोजी पालक शाळा उपक्रम घेण्यात आला.     दिलेल्या सूचनेनुसार सर्व पालक वर्ग त्या दिवशी अगदी लहान विद्यार्थ्याप्रमाणे म्हणजेच दप्तर ,पाण्याची बाटली ,खाऊचा डबा ,पाटी व पेन्सिल शाळेत घेऊन आले होते. पालक स्वतःला पालक न समजता विद्यार्थी समजूनच अगदी लहान मुलाप्रमाणे वावरत होते. आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थी प्रमाणेच त्यांना शिकवत होते.

      या उपक्रमामुळे पालकांना सुद्धा त्यांच्या लहानपणीचा शाळेचा दिवस पुन्हा एकदा अनुभवता आला. याचा त्यांना खूप आनंद झाला हे त्यांनी दिलेल्या अभिप्रायातून लक्षात आले.

 

 

Scroll to Top