🔧 नळदुरुस्ती प्रशिक्षण कार्यशाळा 🔧
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे ७ ऑक्टोबर रोजी नळदुरुस्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्री. दिलीप कर्णे सर उपस्थित होते. त्यांनी नळदुरुस्तीचे महत्त्व तसेच नळातील गळती कशा पद्धतीने दुरुस्त करावी याबाबत मार्गदर्शन केले. नळदुरुस्तीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांची नावे, उपयोग व कार्यपद्धती यांची माहिती दिली. तसेच विविध साधनांचा प्रत्यक्ष वापर करून नळदुरुस्तीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि कौशल्याधारित ठरली.










