माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा: मराठी माध्यम – माध्यमिक विभाग

माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग – मराठी माध्यम, येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘माहिती अधिकार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रचना पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी विद्यार्थी प्रतिनिधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून माहिती अधिकारविषयक घोषवाक्ये म्हणून घेतली.

सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रीती धोपाटे यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, अंमलबजावणी, उद्देश व महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनाची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमास विद्यालयातील एकूण ४५८ विद्यार्थी व १६ शिक्षक उपस्थित होते. घोषवाक्ये आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.

Scroll to Top