नागपंचमी प्रकल्प

                         विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू सणांची ओळख व माहिती मिळावी या हेतूने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दि.२९/७/२०२५रोजी नागपंचमी प्रकल्प  मांडण्यात आला.

या प्रकल्पामध्ये नागाचे वारुळ, नाग , गारुडी, झोक्यावर बसलेल्या मुली, पूजा करणाऱ्या स्त्रिया, गवत, यांचे कट्आउट्स मांडण्यात आले होते.

                            सर्व विद्यार्थ्यांना हा प्रकल्प दाखवून शिक्षकांनी नागपंचमीची माहिती सांगितली.  नागपंचमीला घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.तसेच शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या सापाची भिती दूर व्हावी म्हणून हा सण साजरा केला जातो.असे मुलांना सांगण्यात आले.हा प्रकल्प पाहण्यासाठी पालकांना बोलवण्यावून त्यांचा अभिप्राय घेण्यात आला .

Scroll to Top