||गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया||
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात महिलांची पौष्टिक मोदक स्पर्धा दि.२३/०८/२०२५ रोजी घेण्यात आली.
ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा की पालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांना जंग फूड चा वापर करून न देता आपल्या सणांची व पारंपारिक पदार्थांची ओळख होऊन पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना सेवन करता यावे. यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ह्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी गाठीशी अनुभव असलेल्या परीक्षक सौ. माधुरी शिरवडकर व सौ. मधुरा कानिटकर यांचा निवड करण्यात आली होती.
महिला पालकांनी विविध ड्रायफ्रूट, भाज्या, गुळ-तीळ, बीट अशा विविध खाद्यपदार्थांचा वापर करून अतिशय छान असे मोदक बनवले होते.
अशाप्रकारे पारंपारिक मोदकाला पौष्टिकतेचे स्वरूप देऊ गणेश चतुर्थी ह्या सणाची शोभा वाढवून ही स्पर्धा आनंदात पार पडली.





