ऐल्लमा पैलमा गणेश देवा ।
माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा ।।
हे गाणं ऐकलं की आठवतो तो भोंडला. अश्विन प्रतिपदेपासून ते दशमी पर्यंत देवीचे नवरात्र सुरू होते. त्या नऊ दिवसात भोंडला साजरा करतात. हे मुलांना कळावे यासाठी २६/९/२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागात भोंडला साजरा करण्यात आला .
मा. मुख्याध्यापकांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले .व सह. शिक्षिका चारुता मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना भोंडल्याची माहिती सांगितली . नंतर रंगबिरंगी पोशाखात असलेल्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक भोंडल्याच्या गाण्यावर फेर धरला.
नंतर मोठा- शिशुच्या काजल गाडे या पालकांनी मोबाईलद्वारे आपली कशी फसवणूक होऊ शकते , व त्यासाठी आपण कोणती सावधानता बाळगली पाहिजे, याचे सर्व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच महिला पालकांनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. छोटा -शिशुच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला. सर्व पालकांनी सुद्धा गाण्यावर फेर धरून आनंदमय वातावरण तयार केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद म्हणून सर्व पालक वर्ग व विद्यार्थ्यांना पौष्टिक अशी शेंगदाणा -राजगिरा चिक्की देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पालकांनी विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली हे त्यांनी दिलेल्या अभिप्रायातून स्पष्ट झाले.
अशाप्रकारे पारंपारिक संस्कृती जपणारा भोंडला साजरा केला.








