प्रवेशोत्सव २०२६-२७ (माध्यमिक विभाग- मराठी माध्यम)

सोमवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, म. ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग – मराठी माध्यमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी, शालामाता सज्ज होती. स्वागताचे फलक लिहिले गेले, आणि ढोल – ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सौ. रचना पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षकांनी औक्षण करून व पेन देऊन स्वागत केले. इ.५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.

शालेय पोषण आहारांतर्गत पायनॅपल शिरा आणि खिचडी भात या खाऊचे वाटप करून शैक्षणिक वर्षाची मंगलमय सुरुवात झाली.

Scroll to Top