विद्यार्थी प्रवेशोत्सव २०२६ [प्राथमिक मराठी ]

विद्यार्थी प्रवेशोत्सव २०२६

​दिनांक १५ जून २०२६ रोजी शाळेत उत्साहात ‘विद्यार्थी प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. सुट्टीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करून, मुख्याध्यापिका मा. देवरे मॅडम यांच्या हस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित मनोरंजनात्मक कार्यक्रमात मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाळेची माहिती दिली व सर्व वर्गशिक्षकांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना पौष्टिक राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी नवीन क्रमिक पुस्तके दिली गेली. मुख्याध्यापिकांच्या शुभेच्छांनी आणि आनंदमय वातावरणात हा प्रवेशोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Scroll to Top