सोमवार दिनांक २६/०१/२०२६ रोजी नवीन पनवेल येथील म. ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या परंपरे नुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कु.प्रांजली रावसाहेब सरक या विद्यार्थिनीने सर्व प्रथम येऊन आपल्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान मिळवून दिला.
या प्रसंगी म. ए. सो. क्रीडावर्धिनी मार्फत तायक्वांदो,बॉक्सिंग,थाय बॉक्सिंग अशा विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या शिवाय मराठी व इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीतांच्या तालावर केलेल्या कवायतीने उपास्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रसंगाचे औचित्य साधून मराठी व इंग्रजी माध्यमातील शिष्यवृत्ती परीक्षा , हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा , भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा ,शासकीय चित्रकला परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा देखील पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. व श्री.रावसाहेब सरक व व्यास पीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रत्येक विभागातील एका विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त एका पेक्षा एक सुंदर भाषणे करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या प्रसंगी माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या . इतर सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका मा.महाजन मॅडम , मा.देवरे मॅडम, मा.साळुंखे मॅडम, मा.जोशी मॅडम यांची प्रेरक उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी केले.






















